Sunday, November 23, 2014

samarthchi shikavan

दहा वर्षे बालपण वीस वर्ष तारुण्य !

अंगी चढता मदन मग कैसा नारायण !

सावध सावधान वाचे बोला नारायण !

तीसाशी होय भरती दारा पुत्र लागे प्रिती !

मायेशी पडे भ्रांती मग कैसी ईश्वरप्राप्ती !

चाळीस वर्षे झाली डोळा चालीसी आली !

नेत्रासी भुली पडली कोणी ना दिसे जवळी!

पन्नास वर्षे होती हालती दात पंगती !

काळ्याचे ढवळे होती त्यासी म्हातारा म्हणती !

साठीची बुद्धी नाठी वसवस लागे पाठी !

हाती घेउनिया काठी त्यासी हासतात कार्टी !

सत्तारसी होय रचना हालवेना चालवेना !

उठवेना बसवेना मग तो दिसे दैनवाना !

चाराविसा मिळोनी ऐसी मग तो झाला अपैशी !

जाळा विना जैसी माशी तैसे झाले प्राण्याशी !

वर्षे होता नव्वद बोलवेना एकही शब्द !

दारा पुत्र म्हणती देवा तोडी याचा संबंध !

शत वर्षे पुरुष झाला आला तैसाची गेला !

रामदासी याची बोला वेगा सावध झाला !